Sunday, October 21, 2012

srimad dasbodatil marma.

           श्रीमद दासबोधाचे मर्म -- भक्ती,ज्ञान,वैराग्य, ब्रम्ह 

                  आणि माया यांचे विवेचन.
                 
             1) आत्मनिवेदन भक्ती.

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथाच्या सुरवातीस प्रस्तावनेत म्हटले आहे “येथे बोलीला विशद  भक्तीमार्ग”. मनाचे श्लोक या लघु ग्रंथात सुद्धा भक्ती मार्गाचेच महात्म्य सांगितलेले आहे. ते म्हणतात “मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे.” परमेश्वर प्राप्तीसाठी, ज्ञानमार्ग आणि  कर्ममार्ग, या पेक्षा भक्ती मार्ग हा सोपा राजमार्ग असून सामान्य जनांसाठी आचरण्यास सुलभ आहे असे श्री समर्थांचे निश्चयात्मक मत आहे. यामुळे त्यांनी आपल्या ग्रंथांमध्ये भक्तीला अधिक प्राधान्य दिले आहे. असे असले तरी या ग्रंथात विषयांची  इतकी विपुलता आहे की  “यदिहास्ती तदन्यत्र, यान्नेहास्ती न तक्वचीत” अर्थात येथे जे आहे तेच दुसरीकडे सापडेल. येथे जे नाही ते अन्यत्र कोठेच मिळणार नाही.  श्री समर्थांनी भक्तीचे नउ प्रकार सांगितले आहेत. ते असे,  श्रवण, कीर्तन, नामस्मरण, पादसेवन, अर्चन, वंदन, दास्य, सख्य, आणि आत्मनिवेदन. यातील प्रत्येक प्रकारच्या भक्तीचे  स्वतःचे आपले एक वैशिष्टय आहे. भगवंतांच्या दिव्य लीलांचे, कथांचे श्रवण, त्याच्या गुणांचे कीर्तन, भजन, मधुर नामांचे नामस्मरण,  चरणांचे पादसेवन, वंदन, तसेच भगवंतांच्याप्रती अर्चन, दास्य सख्य आणि आत्मनिवेदन, या नउ प्रकारच्या भक्तीने ईश्वर आपलासा करुन घेता येतो.  भक्ती आणि ज्ञान या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ज्ञानातूनच भक्तीचा उदय होतो. भगवंताच्या सामर्थ्याची सौंदर्याची, कारुण्याची, तसेच भक्तवात्सल्यतेच्या ज्ञानातूनच भगवंताबद्दलची श्रद्धाभावना, मादियता, आपलेपणा निर्माण होते. त्याच्या पोटी भक्तीचा उदय होतो. म्हणून ज्ञानामध्ये भक्तीचा जन्म होतो. त्याच प्रमाणे भगवंताच्या दिव्य, मंगल, मधुर लीलांचे, कथांचे, नामांचे श्रवण, कीर्तन, स्मरण, करीत गेल्याने मन तदाकार होऊन भगवंताच्या अंतरंगात शिरते. ज्या मानाने तदाकारतेची खोली वाढते त्या मानाने भगवंताचे अधिकाधिक ज्ञान होते. म्हणून भक्ती ही ज्ञानाची जननी आहे. भगवंत परमानंद स्वरूप आहेत. त्यांच्या चिंतनात मग्न होऊन भक्त स्वतःला संपूर्णपणे विसरतो त्या वेळी तो आनंद सागरात बुचकळ्या मारीत असतो. म्हणून स्वानंदानुभव हे भक्तीचे चरम फळ आहे.

श्री समर्थ श्रोत्यांना सांगतात आत्मनिवेदन म्हणजे समर्पण करणे, भगवंताच्या हाती आपण स्वःतास सोपविणे, देऊन टाकणे. या सोपविण्यात तीन गोष्टी असतात. (अ) देवास समर्पण करताना आपण अत्यंत आदराने आणि प्रेमाने देतो. (आ) एकदा एक वस्तू समर्पण केल्यावर त्या वस्तूवरील ममत्व, माझेपणाचा हक्क, आसक्ती आणि प्रीती,आपण सर्वस्वी सोडून देतो. (इ) त्या वस्तूला आपण विसरतो. एकदा आपण स्वतःस भगवंतास समर्पण केल्यानंतर आपण आपल्या “मी”ला संपूर्णपणे विसरून जाऊन भगवंताच्या चरणी अनन्य व्हावे. श्री समर्थ पुढे म्हणतात श्रोत्यानो, जो भक्त असतो तो भगवंतापासून कधीच विभक्त होत नाही आणि जो विभक्त असतो तो खरा भक्त होऊ शकत नाही. मी कोण आहे, माझे खरे स्वरूप काय आहे? याचा सारा सार विचार करावयास हवा. तसेच भगवंत कोण आहे याचा शोध करण्यासाठी आपण आपल्या अंतरंगात उतरून खऱ्या मी चे ज्ञान करुन घ्यावे. खरा मी हा माझा देह नसून मी आत्माच आहे अशी निश्चयात्मक बुद्धी झाली म्हणजे अर्थात मी चे ज्ञान झाले की भगवंताचे ज्ञान आपोआप होते. मी कोण हा प्रश्न दिसतो साधा परंतु त्याचे उत्तर शोधू लागल्यास मुलतत्वांची मीमांसा करावी लागते. अशी मीमांसा करता,करता अखेर ज्या “मी”ला आपण आज मी मानतो तो मी म्हणजे देह खरा नाही असे स्पष्टपणे दिसून येते. एका तत्वाने दुसऱ्या तत्वाचा ज्यावेळी निरास होत जातो, त्यावेळी आपण निराळे उरत नाही. अशाप्रकारे तत्व निरसनाने आत्मनिवेदन सहजच घडते. श्री समर्थ म्हणतात “ मनुष्य म्हणजे देह + मन + आत्मा. यातील आत्मा हा खरा ‘मी’ होय. परंतु आज आपण देह आणि मन यांच्या युतीस “मी” असे मानतो. परंतु देहबुद्धीच्या आश्रयाने वावरणारा “मी” तत्व विचारांसमोर टिकत नाही. खोटा मी नाहीसा होणे हेच आत्मनिवेदन होय. संपूर्ण विश्व हे पंच महाभूतानि बनलेले आहे. त्याचे विवेकाने विवेचन केले तर, सर्वांचा निरास होतो. अशा प्रकारे दृष्य विश्वाचे किंवा प्रकृतीचे निरसन झाले की आत्मस्वरूप तवढे शिल्लक राहते. मग आपला “मी” वेगळा राहतोच कोठे? या विश्वात मुख्य मूलतत्वे दोनच आहेत. एक परमेश्वर आणि दुसरी विश्वाचा आकार घेवून दिसणारी प्रकृती. या दोघामध्ये “मी” हा चोर येतोच कोठे?” आपण या विश्वाकडे सक्षित्वाने पाहू लागल्यास ती तत्वे सहजपणे नाहीशी होतात, नंतर प्रत्यक्ष आत्म्याचा अनुभव आला की साक्षिपणा सुद्धा उरत नाही. विश्वाच्या आरंभी केवळ आत्माच होता आणि विश्वाच्या अंती सुद्धा केवळ आत्माच शिल्लक राहतो. असे असताना आपल्या मी पणाला वेगळे अस्तित्वच उरत नाही. श्री समर्थ पुढे म्हणतात “मी पणा विरणे  अर्थात लयास जाणे हेच आत्मनिवेदनाचे मर्म आहे.” आत्मा सगळीकडे व्यापून आहे. आपल्या सच्चीदानंद स्वरूपाने तो भरलेला आहे आणि मीच तो आत्मा सगळीकडे व्यापून आहे असे श्रुती सांगते. म्हणजे खरा मी सगळीकडे व्यापून आहे आणि स्वानंदाने संपूर्ण भरलेला आहे. हे खरे असताना मी अन्य कोणी निराळा असूच शकत नाही. म्हणून देहाचा अहंकार असत्य आहे. “कोहम” अर्थात मी कोण आहे? याचे उत्तर “सोहम” अर्थात तो मी आहे आणि मी तो आहे. श्री समर्थ  म्हणतात “या उत्तरामध्ये भरून असलेला अर्थ उकलुन पाहावा. त्याच्या विचारात शिरले की “मी”  आणखी कोणी निराळा  आहे असे सिद्ध होत नाही.”

“तत् त्वं असी”  म्हणजे “ते तू ब्रम्ह आहेस”  असे उपनिषदातील स्वानुभवाचे महावाक्य आहे. या मधील तिन्ही पदांचे उल्लंघन करुन  जो आत्मस्वरूपापर्यंत पोहोचला त्याला भेद आणि अभेद दोन्हीही लटके होतात. आत्मवस्तू मुळातच भेदरहित असल्याने तिला भेद आणि अभेद स्पर्श करू शकत नाहीत. ती आत्मवस्तू जो स्वतः बनला त्याला मी देह आहे अशी मी पणाची निराळी अवस्था कशी असणार? म्हणून मी पणा असत्य आहे. मी जीव आहे आणि तो शिव आहे हा विद्या आणि अविद्या यांनी निर्माण केलेला भेद आहे. या भेदाची उपाधी नाहीशी केली तर मूळ  आत्मस्वरुपात जीव, शिव असा भेद नाही हे ध्यानात येईल. जीव, शिव भेदरहित असलेला आत्मा हेच आपले खरे स्वरूप आहे, असा निश्चय झाला की मी देह आहे ही अहंता असत्य ठरते. भगवंत आणि भक्त दिसावयास भिन्न दिसले तरी ते वेगळे नसतात. ते दोघे एकमेकांशी अनन्य असतात, एकरूप असतात. भक्ताने आपला संपूर्ण मी पणा भगवंताला अर्पण करुन  त्याच्याशी एकरूप होऊन जाणे  यालाच आत्मनिवेदन असे म्हणतात. ज्या प्रमाणे पंच महाभूतांमध्ये आकाश श्रेष्ठ, समस्त देवांमध्ये जगदीवर श्रेष्ठ त्याच प्रमाणे सर्व भक्तीच्या प्रकारात “आत्म निवेदन भक्ती” सर्वात श्रेष्ठ आहे. ही आचरली असता सायुज्य मुक्ती मिळते. या संपूर्ण विश्वाचा लय झाला तरी सायुज्य मुक्ती मध्ये कोणताही फेरबदल होत नाही.

\               2) शुद्ध ज्ञान आणि वैराग्य.

श्री समर्थांनी शुद्ध ज्ञानासंबंधी केलेले विवेचन आता आपण पाहू. सामन्यपणे ज्ञान म्हटले की  आपल्या दृष्टी समोर विविध शास्त्रांतील विवेचनाचे दृश्य दिसते. परंतु श्री समर्थ म्हणतात ज्ञान म्हणजे केवळ आत्मज्ञान अन्य कांही नाही. आपण आपणास, स्वत:स पहाणे, आपल्या सत्य स्वरूपाला जाणणे, अर्थात मी कोण ते ओळखणे हेच खरे ज्ञान आहे. मी म्हणजे हा देह नसून  सच्चिदानंद स्वरूप, अविनाशी असा आत्माच आहे. माझा हा पंचभूतानी बनलेला  देह नारळाच्या कवटी सारखा बाहेरील आवरण आहे. आपणामधील खरा मी हा आत्मा आहे त्यास ओळखले पाहिजे. या विश्वात कायम टिकणारे काय आणि तात्पुरते राहणारे काय आहे ते निश्चित करावे. याला ज्ञान म्हणतात. श्री समर्थ पुढे म्हणतात, मनुष्याचा देह हा तात्पुरता आणि नश्वर आहे. परंतु आत्मा मात्र कायम टिकणारा आहे. खरा मी म्हणजे हा देह नाही तर मी आत्मस्वरूप आहे. तोच ब्रम्हस्वरूपाने ईश्वर आहे. हे स्वरूपच कायम टिकणारे आहे. या संदर्भात तैत्तरियोपनिषद सांगते “सत्यम ज्ञानम अनंत ब्रह्मम” तसेच एतत्तरिय उपनिषद सांगते “प्रज्ञाने ब्रह्मम” आत्मस्वरूप आणि ज्ञान अभिन्न आहेत. ज्या अवस्थेमध्ये प्रकृतीचा पसारा संपतो, पंचभूतांचा डोलारा मावळून मी, तू हा व्दैतभाव संपूर्णपणे नष्ट होतो, त्या अवस्थेस ज्ञान असे म्हणतात. समर्थ पुढे सांगतात जो अनुभव बुद्धी, मन यांना आकलन होत नाही, जो तर्काने विचारांच्या कक्षेत आणता येत नाही. परा  वाणीच्याहि पलीकडे आहे त्या अनुभवाला ज्ञान असे म्हणतात. देह बुद्धीच्या तीन अवस्था- जागृती, स्वप्न, आणि सुषुप्ती या तिघीना ओलांडून चौथ्या अवस्थेत प्रवेश केला की  आत्मबुद्धी उदय पावते. परंतु ती सुद्धा मावळून केवळ स्वरूप उरते, हे खरे ज्ञान आहे. पदार्थ ज्ञान म्हणजे दृश्य पदार्थ जाणणे, दृष्यरहित शुद्ध स्वरूप जाणणे म्हणजेच आत्मज्ञान. आत्मा हा ब्रम्हस्वरूप किंवा आत्मरूप आहे आणि आपण आत्मस्वरूप आहोत म्हणून आपण ब्रह्मस्वरूप अथवा परमात्म स्वरूप आहोत. सर्व महावाक्यांचा अर्थ असाच आहे. मी देह नसून आत्माच आहे आणि आत्मा ब्रह्मस्वरूप असल्याने मी ब्रह्मस्वरूप आहे असा प्रत्यक्ष अनुभव आला म्हणजे आत्मज्ञान प्राप्त झाले असे समजावे. हे ज्ञान अति सूक्ष्म विचारांनी आपल्यामध्ये उदय पावते आणि त्याच्यामध्ये सारे विरोध मावळतात. आत्मज्ञान झाले की आपण बांधले गेलो आहोत हा अज्ञानाने  होणारा भ्रम नष्ट होतो. आत्मज्ञानाला मोक्ष देणारे ब्रम्हज्ञान असे नांव आहे. आत्मा सर्वव्यापी असल्याने आपण आत्मज्ञानाने सर्वज्ञ बनतो. सर्व ठिकाणी मीच व्यापून आहे असा अनुभव आल्याने देहापुरता मी आहे ही आकुंचित वृत्ती शिल्लक राहत नाही. श्री समर्थ श्रोत्यांना पुढे सांगतात आत्मज्ञान सर्व ज्ञानाचे शिखर आहे. सद्गुरूंच्या कृपेने ते विनासायास प्राप्त होते. सद्गुरूंचे वचन हेच आत्मज्ञानाच्या बाबतीत परम श्रेष्ठ प्रमाण आहे. अति खोल आणि अतिगंभीर असे कांही असेल तर ते सद्गुरूवचन आहे. सद्गुरूवचन हाच खरा सिद्धांत होय. ते वचनच खरे अनुभवलीलेले ज्ञान आहे. श्री समर्थ पुढे म्हणतात  “श्रोत्यानो, ते वचनच खरोखरी माझ्या जीवनाचे रहस्य आहे, गुपित आहे. ते मी आता तुम्हाला सांगतो. “अहं ब्रम्हस्मी”   हे महावाक्य आहे. “मी ब्रम्ह आहे” असा याचा अर्थ आहे. या अर्थामध्ये गुरु आणि शिष्य दोघे एकरूप होऊन जातात. श्रोत्यानो या महावाक्यातील मर्म ऐका “तुम्ही सर्व स्वतः ब्रम्हरूप आहात.” याबद्दल किंचितही शंका मनात बाळगू नका. एवढे बोलून श्री समर्थांनी शुद्ध ज्ञानाचा समास संपविला.

                                         वैराग्य विवेचन.

“विषयत्याग” या समासाच्या प्रारंभीच शिष्य गुरुदेवांना प्रश्न विचारतात “गुरुदेव| विषयांचा त्याग म्हणजे इंद्रिय सुखांचा संपूर्ण त्याग केल्याशिवाय परमार्थ साधत नाही. हे जर खरे आहे तर प्रापंचिकाला परमार्थ कसा साधणार?” या प्रश्नाचे उत्तर देताना श्री समर्थ म्हणतात “शिष्यानो| विषय त्यागावाचून अथवा वैराग्याशिवाय कोणासही परमार्थ साधत नाही, हे निर्विवाद आहे.परंतु विषय त्याग म्हणजे काय हे जाणून घेणे आवश्यक आहे. प्रापंचिकाला किंवा परमार्थी साधकाला नित्य कर्म म्हणजे खाणे, पिणे, निजणे, बसणे, जाणे, येणे हे देहधर्म व्यवस्थित करावेच  लागतात. ते न करता कोणासहि  जगता येणार नाही. परंतु प्रापंचिकाच्या आणि पारमार्थिक साधकाच्या अंतरंगात मोठा फरक असतो.प्रापंचिक व्यक्ती अनुताप न करिता केवळ प्रपंचाकरिता जगत असतो. तो, खाण्या पिण्यासाठी, मौज मस्ती करण्यासाठी, देहाला सुख देण्यासाठी  निरंतर प्रयत्न करीत असतो. परंतु पारमार्थिक व्यक्ती, परमार्थी साधक भगवंताची साधना करण्यासाठी, परमेश्वर प्राप्तीसाठी देह उपयोगी पडावा, तो उत्तम स्थितीत राहावा म्हणून देहाला खाऊ पिऊ घालतो. हे करीत असताना तो आचार विचाराने आपले पावित्र्य कसोशीने पाळतो. वैराग्य ही मनाची अवस्था असते. श्री समर्थ म्हणतात प्रापंचिकास भगवंताच्या भजन,पूजन, तीर्थयात्रा, यासाठी देह उत्तम स्थितीत ठेवणे आवश्यक आहे. त्यासाठी अत्यंत प्रमाणशीर देहसुख भोगण्यास कांहीच हरकत नाही. अत्यंत माफक सुख, त्यात आसक्ती न ठेवता भोगणे, हाच प्रापंचिकाचा त्याग आहे. हेच त्याचे वैराग्य आहे. वैराग्य संपन्न व्यक्ती म्हणजे ईश्वरी पुरुषच. श्री समर्थ म्हणतात “वैराग्यासारखे भाग्य नाही. वैराग्य नसेल तर ते दुर्भाग्यच. वैराग्याच्या अभावी परमार्थ योग्य प्रकारे होत नाही. ज्याच्यापाशी अनुभवाचे ज्ञान आहे, ज्याची आसक्ती सुटलेली आहे, विवेकाच्या जोरावर ज्याने सर्वस्वाचा त्याग केला आहे असा पुरुष म्हणजे महायोगी समजावा.   

                  3) ब्रम्ह निरुपण.

हे संपूर्ण विश्व पंचमहाभूतांपासून निर्माण झालेले आहे. परंतु ते कायम टिकणारे नाही. त्यात सतत बदल होत राहणे हा विश्वाचा मूळ स्वभावच आहे. हे विश्व निर्माण होण्यापूर्वी आणि निर्माण झाल्यानंतर गुणातीत ब्रम्ह जसेच्या तसे राहते. ही खरी शाश्वतपणाची खुण आहे. पंचभूतांपासून निर्माण होणाऱ्या सर्व वस्तू नाशवंत असतात.विश्व आले आणि गेले तरी जी वस्तू अबाधित राहते ती निर्गुण ब्रम्ह होय. मूळ, शुद्ध, निर्मळ, आणि गुणातीत परब्रह्माला या विश्वाचा पत्ता सुद्धा नसतो. सच्चीदानंद हा त्या परब्रह्माचा स्वभाव आहे. त्यातील आनंदाला जे स्फुरण असते त्याला माया असे म्हणतात. ब्रम्ह शस्त्राने तोडता येत नाही, विस्तवाने ते जळत नाही, पाण्यात कालविले जात नाही, ते गतिमान वायुने उडत नाही. ते पडत नाही, झडत नाही, त्याला घडविता येत नाही. त्याला कोणताही रंग नाही, ते सर्व पदार्थापेक्षा वेगळेच आहे. ते सदा सर्वकाळ असते, ते निरंतर टिकते. ते दिसत नसले तरी सर्वत्र भरून आहे. ते सूक्ष्मपणाने प्रत्येक ठिकाणी व्यापलेले आहे. जे इन्द्रियाना दिसते आणि उघड असते ते  नेहमी असार असते, मिथ्या असते. जे गुप्त असते ते सूक्ष्म असते, ते सार असते, सत्य असते. गुरुदेवांकडून प्रत्यक्ष ऐकलेल्या उपदेशाने हे विवेचन बरोबर कळते. साधना करुन सूक्ष्म ब्रम्ह पाहण्याचे, अनुभवण्याचे सामर्थ्य अंगी आणावे. अध्यात्म श्रवण करुन ते परब्रम्ह प्राप्त करुन घ्यावे. परब्रम्ह हे आप, तेज, वायू नव्हे,ते व्यक्त नाही, इन्द्रियाना दिसणारे नाही, ते अव्यक्त, अतींद्रिय आहे. ब्रम्ह डोळ्यांनी दिसत नाही. त्यामुळे केवळ इंद्रिय दृष्टीने पाहणाऱ्या मूढ लोकांना ते नसल्या प्रमाणे वाटते. ते सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. ब्रम्ह इतके सूक्ष्म आहे की ब्रम्हदेवाना सुद्धा ते जाणणे कठीण पडते. ब्रम्ह असे आहे, तसे आहे, असे कितीही वर्णन केले तरी त्या वर्णनाहून ते निराळेच आहे. श्री समर्थ म्हणतात श्रवण करुन साधनाभ्यास करणे हा एकच उपाय ब्रम्हदर्शन करुन देतो. ब्रह्माची असंख्य नांवे आहेत ते खरे परंतु ब्रम्ह त्या नांवाच्या पलीकडे आहे. कोणतेही नांव त्याचे स्वरूप असे आहे हे निश्चित पणाने सांगू शकत नाही. ब्रम्ह हे  “ ब्रम्हनाद” रूप आहे, ज्योतिरूप आहे, चैतन्य रूप आहे, सक्षिरुप आहे. ते सनातन आहे. सर्वज्ञ आहे, सर्वात्मा आहे, सर्वेश्वर आहे. ते सदोदित आहे, शाश्वत आहे. शब्दांच्या पलीकडे आहे. ते विशाल आहे, विस्तीर्ण आहे, विश्वाला  ते भरून आहे. ते आकाशाप्रमाणे मळहीन आहे. ते आत्मा, परमात्मा, आणि परमेश्वर आहे.                                   

                   4)  मायेचे स्वरूप.

   सच्चीदानंद स्वरूपातील परब्रम्हातील आनंदाला जे स्फुरण येते त्याला माया असे म्हणतात. मायेमुळे परमात्मा ईश्वर रुपाने मनुष्याच्या आटोक्यात येतो. मायेमध्ये अनेक शक्ती वास करतात. त्यापैकी प्रकृती ही एक शक्ती आहे. ती हे दृष्य विश्व निर्माण करते. ती स्वतः अव्यक्त असून सर्व व्यक्तांचे मूळ आहे. तिच्यामध्ये आठ अंगे असतात. तीन गुण सत्व, रज, तम आणि पंच महाभूते मिळून अष्टधा प्रकृती बनते. प्रकृती ही विश्वव्यापी असल्याने व्यक्त अवस्थेस येताना तिचा सर्वव्यापीपणा सामान्यपणे कायम ठेवते. यामुळे जगातील वस्तुना दोन अंगे असतात. एक सामान्य आणि दुसरे विशेषांचे अंग. विशेषाला व्यक्ती किंवा रूप असे म्हणतात तर सामन्याला जाती किंवा नाम असे म्हणतात. सामान्य अव्यक्त असते परंतु बुद्धीला आकलन होते. अव्यक्तामधून व्यक्त रूप धारण करते. कांही काळ तेथे वावरते नंतर पुन्हा अव्यक्तात विलीन होते. या प्रकृतीच्या खेळास दृष्य असे म्हणतात. हे अंतिम सत्य नसल्याने प्रत्यक्ष दिसत असले तरी भ्रमरूप असते. ते बाजूस सारून परमात्म स्वरूपाचा अनुभव घ्यावा लागतो. माया ही परमात्म स्वरुपाची शक्ती दृश्याचा सारा खेळ घडवून आणते. माया हा शब्द “मा” या धातूपासून तयार होतो. “या” म्हणजे मोजणे, मावणे, समावेश होणे. माया म्हणजे “विश्वमती यास्याम” जिच्या मध्ये विश्व सामावले जाते. जी परब्रम्हला मोजमापात आणते.  शुद्ध, निर्मळ, निर्गुण परब्रह्मामध्ये अनंत शक्ती आहेत त्यापैकी दृष्य, नामरूपे किंवा आकार निर्माण करणारी ही एक विलक्षण शक्ती आहे. ही प्रथम आत्मरुपावर झाकण घालते. या शक्तीचे  नांव आहे माया आणि झाकणाचे नांव आहे अज्ञान.  अविद्या, अध्यास, भ्रम, देहबुद्धी ही सारी मायेचीच प्रजा आहे. आत्मज्ञानी पुरुष मायेच्या प्रभावाने फसून जाऊन आत्मस्वरुपास विसरत नाही आणि दृष्याला खरेपणा देत नाही. परंतु अज्ञानी व्यक्ती मायेच्या अधीन होऊन स्थळ काळ निमित्तांच्या बंधनात वावरतो त्यामुळे आत्मस्वरूप तर विसरतोच, परंतु त्याबरोबरच संपूर्ण विश्व सत्य मानतो. आत्मज्ञानाच्या भूमिकेवरून पहिले तर ब्रम्ह आणि त्याची शक्ती दोन्ही एकरूपच आहेत. परंतु आज्ञानाच्या भूमिकेवरून पाहिल्यास ब्रम्ह आणि माया वेगळी वाटतात.म्हणून मानवी बुद्धीच्या पद्धतीने श्री समर्थांनी ज्ञानमय ब्रम्ह आणि अज्ञानमय माया यांची तुलना केली आहे. ते म्हणतात ब्रम्ह निर्गुण निराकार तर माय सगुण साकार, ब्रम्ह अनंत तर माया परिमित आहे. ब्रम्ह निर्मळ निश्चल, तर माया चंचल,चपळ आहे. ब्रम्ह दिसत नाही परंतु माया दिसते. ब्रम्ह भासत नाही परंतु माया भासते. ब्रम्ह कल्पांत काळी सुद्धा नाश पावत नाही, परंतु माया नाश पावते. ब्रम्ह निर्माण होत नाही, परंतु माया  निर्माण होते. ब्रम्ह क्षय पावत नाही परंतु माया  क्षय पावते. ब्रम्ह विकारांपासून मुक्त,  तर माया  विकारयुक्त असते. ब्रम्ह कांहीच करीत नाही परंतु माया सर्व कांही करते. विश्वामध्ये सर्वकडे माया  पसरलेली आहे त्यामुळे ब्रम्ह झाकले गेले आहे. परंतु साधू पुरुष मायेच्या विस्तारातून शुद्ध ब्रम्ह स्वरूप निवडून घेतात. ब्रम्ह अत्यंत सूक्ष्म, तर माया  आत -बाहेर स्थूल आहे. ब्रम्ह वाणीने वर्णन करुन सांगता येत नाही. माया जसे तिचे वर्णन करावे तशी असते. विवेक वापरून माया आणि ब्रम्ह याना वेगळे केले असता जन्म मरण चुकते.

                || जय जय रघुवीर समर्थ ||

दिनांक ११ आक्टोबर २०१२

निज भाद्रपद इंदिरा एकादशी         || हरी ओम तत्सत. ||

*******************************************************

 श्रीमद दासबोधाचे मर्म -- भक्ती,ज्ञान,वैराग्य,

 ब्रम्ह आणि माया यांचे विवेचन.

                                      2) शुद्ध ज्ञान आणि वैराग्य.

                              श्रीमद दासबोधाचे मर्म -- भक्ती,ज्ञान,वैराग्य, ब्रम्ह आणि माया यांचे विवेचन.

Saturday, October 20, 2012

Swamy Vivekanand.

                              Swamy Vivekanand .
Great saints are born  once in a century ,but are remembered by the the future generations for centuries together. swamy  Vivekanand was such a great  saint born during ninetinth  century, but his teachings are still  guiding us as a powerful  torch in the  darkness of ignorance. Vivekanad was born in a holy family, on January 12, 1863, in the city of  Calcutta in India. It is said that  " a great soul is born in  a  family only when  five or six earlier generations in that family had led pious life and accumaleted  lot Punya (blessings from the God). 
From the early childhood  Narendra (earlier name of Swamy Vivekanand)    was a precocious boy of exceptional intelligence and energy. He had innate tendency  for meditation  from his child hood. Once Narendra was meditating with his friends, when a cobra appeared from a hole. The other boys were frightened  and they ran away warning him about the appearance of the cobra. But Narendra remained motionless and the cobra lingering for a while crawled  away. later he told his mother  " Ma I know nothing about  the snake or any warning. I was experiencing in expressible joy. 
Once during his days as a student, Vivekanand had a vision of lord Buddha. he had naretted  the incident  as follows. " While studying at school, one night I was meditating behind closed doors and had fairly deep concentration of mind. How long I meditated in that way I can not say. It was over and I still kept my seat, when from the southern wall of the room a luminous figure stepped out and stood in front of me. It was the figure of a sanyasin (monk), absolutely calm, with shaven head and a staff  and kamandalu (water pot) in either hand. He gazed at me for some time, and seemed as if he would address me, I too gazed at him in speechless wonder. Suddenly a kind of freight  seized me. I opened the door and hurried out of the room. Then it struck  me that it was foolish of me to run away like that. Perhaps he might say something to me.But I have never seen that  figure since. I think it was the lord Buddha whom I saw." 
Ramkrishna paramhansa, a great saint and an ardent devotee of " Ma Kali" was spiritual guru (Teacher) of Narendra.  At one of their first meetings, sri Ramakrishna   asked Vivekanand " Do you see a light when you are falling asleep?  "Yes I do. Doesn't  everyone? The boys voice was filled with wonder. This reply provided the Gurudev with a deep insight in the past, the nature and the destiny of this remarkable youngster,  who would later  become swami Vivekanand. The first visit of the Gurudev also   gave  Narendra the magic touch which banished the sense of duality from him  and gave him the taste of  transcendental  consciousness. Generally the spiritual teacher helps his disciple  to attain Samadhi (transcendental consciousness)  But  sriramkrishna had much  higher expectation of his disciple. Actually the Gurudev scolded  Vivekanand for  such an insignificant  thing like samadhi. He said "Narendra, I thought that you would be like big Banyan tree and thousand people would rest under your shade. But now I see that you are  seeking your own liberation" Thus rebuked, Vivekanand shed tears,  realizing  the greatness of his gurudev. 
 There was an interesting incident at Cossipore garden house of Vivekananda when he experienced "Nirvikalp samadhi" the supreme realization of vedanta as well  as of yoga. One evening, while while he was meditating with Gopal a senior brother-disciple, he felt as if a light had been placed behind his head. This light became more and more intense and then Narendra passed beyond all relativity and was lost in the absolute. When he regained a little consciousness  of the world he was aware only of his head, but not the rest of the body. He cried out "Gopala, where is my body? Here it is Naren, replied Gopala, trying to reassure him. But when he failed to convince him he was very much terrified and hastened to inform about this incident to Gurudev  Sriramkrishna. Who only said "Let him stay in that state for a while|  he teased me long enough for it." After a long time Vivekanand returned to normal consciousness. An ineffable  joy filled his heart and mind. He went to his Gurudev and  narreted him  the fact, who told him "Now the Divine Mother has shown you all. But this realization of yours will be locked  up for the present, and the key will remain with me. When you have finished doing Mother's work, this treasure will be again yours."
The passing of Vivekaanda's Gurudev,  Sriramkrishna,  created a great gap in his life for some time. But soon he remembered  the tasks before him as told by the Gurudev and travelled all over India as an itinerant monk. He wanted to find a secluded  place  where he could live alone, absorbed in contemplation  of God. Vivekananda says "but Divine Providence had other plans for me. Nothing in my life ever so filled me with the sense of work to be done. It was as if I were thrown out from that life in caves to wander to  and  fro in the plains below." 
One day during his travels in the Himalyas Mountains, he sat to meditate under a pepul  tree by the side of a stream. There he realized the oneness of the universe and man, that man is a universe in miniature. He realized that all that exists in the universe also exists in the body. 
On May 31 1893, Vivekanand began his journey to Chicago in U.S.A to take part in the Parliament of Religions as a representative of Hinduism, more aptly as a  representative of "Sanatan Dharma" which is not related to any country or a state ,but it has universal applications.   It is said that this Indian Saint was allowed to speak for only ten minutes in that religious  parliament, but when he started his Divine speech with the words "my dear brothers and sisters of America, there was thunderous appalause from the audience and they listened to  him with single minded concentration for two hours. 
He proclaimed the supreme  message of  Vedanta which said  "ye are the children of God, the sharers of Immortal bliss, holy and perfect beings. ye divinities on earth - sinners | It is a sin to call a man so. It is a standing  libel on human nature.|  The pepole of America were  so much impressed by the Divine knowledge, simplicity , and the  art of delivering lectures  of this saint , that he has to travel extensively for next three years in the United States of America and many  European countries  to give his divine message of fundamental unity of all religions of the world. 
Being  exhausted by the public lecturing and conducting classes, in the  beginning of June 1895, Swamy accepted an invitation from Mr. Francis Leggett to go to Percy,
New Hampshire to take rest in the silence of the pine wood.  Here he  experienced " Nirvikalp samadhi". In a letter sent to 
Mrs. Ole Bull, Swamy wrote "This is one of the most beautiful spots I have ever seen. Imagine a lake  surrounded with hills covered with a huge forest, with nobody but ourselves. So lovely, so quiet, so restful  and you may imagine how glad I am to be here after the bustle of cities. It gives me a new lease on life to be here. I go into the forest alone and read my Geeta and I am quite happy." 
Vivekanand  had highest regard for men and women irrespective of cast, creed or religion. He used to say "each soul is potentially divine. The goal is to manifest this Divinity within by controlling nature, external and internal. He asks us to do this either by work, worship , psychic control or philosophy - by one or more or all of these- and be free". Regarding grace of the God showered on us, this  holy saint  said " those who are pure always in body, mind and speech, who have strong devotion, who discreminate between the real and unreal, who persevere in meditation and contemplation-upon them alone, the grace of the  Lord  descends. "
 Sriramkrishna had said "Vivekanand was not an ordinary man. but a Nitya-siddha, means one who is born perfect. He also said that Vivekanand was an Ishvarkoti,  or special messenger of the God born on earth to fulfill a divine mission." 
Swamy Vivekananda's life story is that of a phenomenon. He was an ideal Yogi and Monk, teacher and leader, mystic and ascetic, worker and philosopher. He was a saint with most exalted devotion, yet possessed  of the highest knowledge. He was a dedicated humanist, a musician, and orator par excellence and an accomplished athlete. In Vivekananda one catches the  glimpse of a perfect man. Vivekananda's Gurudev sriRamkrishna said about him " Narendra is a great soul- perfect in meditation. He has cut the veils of Maya (Cosmic illusion ) to pieces with the sword of knowledge. Inscrutable maya can never bring him under her control." 
   Vivekananda's  departure from this world was was also wonderful. After consulting an almanac, he chose an auspicious day to end his journey in this world. It was 4th July,1902. He meditated for three hours that morning and conducted a  class on sanskrit grammer and Vedant philosophy for the young monks. In the afternoon he took a long walk with one of his brother-disciples.  On his  return from this walk, the bell was ringing for even-song, and he went to his own room and sat down facing  towards  Holy Ganga river, to meditate. Then on the wings of that meditation, his Atma(spirit) soared whence there could be no return and the body was left like a folded vesture, on the earth. Sister Nivedita had  left this account of her Gurudev Swamy Vivekanand. 
 His last words, spoken to a monastic disciple, who was attending him were "Wait and meditate till I call you."  

                                    ||  Hari om tatsat ||

Date. 24th October 2012.
Vijayadashami.
Boston (Andover)

Saturday, October 6, 2012

श्रीपाद श्रीवल्लभ लीलामृत

                           श्रीपादराजं शरणं प्रपद्ये
                        अंतरंग  
अध्याय क्रमांक                                                      विवरण                                   पृष्ठ संख्या                                                                                                 
------------------           --------------------------------------------------------------            ---------------                                                                                                  १        १)                                श्रीपाद श्रीवल्लभ यांचे प्राकट्य.
      २)                 नरसावधानीचे  वृत्त.
       ३)                बाळ श्रीपादाचा वर्धापनदिन.
        ४)                श्रीपाद प्रभूंचे सर्वव्यापकत्व.
        ५)                नरसिंह वर्मा यांच्या शेतास बालक श्रीपादाची भेट.
        ६)               कुलशेखर मल्लाचा गर्व हरण.
        ७)                महर्षी विद्यारण्यांचे प्राकट्य.
        ८)                श्रीपाद प्रभूंचा सद्गुरू शिर्डी साईबाबा रुपात अवतरित होण्याचा संकल्प.
        ९)               बाळ श्रीपादाच्या दुग्ध समस्येचे निराकरण आणि श्रीपाद हे श्रीदत्त असल्याची
                          पंच महाभूतांकडून साक्ष.
         १०)              बालक श्रीपादाने मोठ्या लीलेने आपल्या पित्यास ऋणमुक्त केले.
         ११)              आनंद शर्मा याना श्रीपाद प्रभूंचा अनुग्रह.
         १२)              श्रीदत्तानंद स्वामीना श्रीपाद प्रभूंचा कृपा प्रसाद.
          १३)              श्रीपाद प्रभूंच्या वात्सल्यास जाती, कुलाचा भेद नाही.
          १४)              श्रीपाद प्रभुनी भक्तांना सांगितलेली बारा अभय वचने.
           १५)             श्रीपाद प्रभूंची क्षुद्रोपसकांना शिक्षा.
           १६)              वेलप्रभू महाराजांचा गर्व हरण.
           १७)              श्रीपाद प्रभूंचे रूप परिवर्तन आणि नामानंदाना अनुग्रह.
           १८)               अहंकारी पंडिताचा गर्व हरण.
           १९)              रविदास रजकास पुढील जन्मी राज्यपद मिळण्याचा
                             श्रीपाद प्रभूंचा आशीर्वाद.
            २०)              खिरीने भरलेले अक्षय पात्र.
            २१)              वल्लभेश्वराचा विवाह.
            २२)              श्रीपाद प्रभूंचे विराट रूप.
            २३)              शंकर भट्टास कुरुगड्डी क्षेत्री श्रीपाद प्रभूंचे प्रथम दर्शन.
            २४)              विश्वावधानी याना पापकर्माचे फलस्वरूप काटेरी वृक्षाचा जन्म.
      -------------              -----------------------------------------------------------------------           ------   
       २५)                       दंडीस्वामींचा गर्व हरण.
       २६)                    श्रीपाद प्रभूंची शिवय्यावर कृपा.
       २७)                    श्रीपाद प्रभूंची शिवयोगीवर कृपा.
       २८)                    श्रीपाद प्रभूंचे चिदम्बर रहस्य.
       २९)                    श्रीपाद प्रभूंची पंचदेव पहाड येथील कल्पनातीत लीला.
       ३०)                    श्रीपाद श्रीवल्लभ यांचा दिव्य उपदेश.
       ३१)                     दशमहाविद्यांचे श्रीपाद प्रभुनी केलेले वर्णन.
       ३२)                     नवनाथांचे वर्णन.
       ३३)                     पुराण सांगणाऱ्या पंडिताची कथा.
       ३४)                     नागेंद्र शास्त्रीना श्रीपाद प्रभूंच्या पादुकांची प्राप्ती आणि पादुकांचा वृतांत.
        ३५)                    संन्यासी महाराजांकडून भक्तांना श्रीदत्तदीक्षा.
        ३६)                     श्रीपाद प्रभूंचे श्रीदत्त स्वरूपात प्रकटन आणि नरसिंह ब्राम्हणास वृश्चिक दंश.
        ३७)                      सुवर्ण पिठीकापुरम वर्णन.
        ३८)                      संन्याशावर बाल श्रीपादाचा विशेष अनुग्रह.
        ३९)                       हनुमंतास भूमीवर अवतार घेण्याची श्रीपाद प्रभूंची अनुज्ञा.
        ४०)                      श्रीपाद प्रभूंचे गोकर्ण क्षेत्रातुन दिव्य लोकात प्रयाण.
        ४१)                     श्रीपाद प्रभूंच्या भक्तांचे कुरुगड्डीस प्रयाण.
        ४२)                     श्रीपाद प्रभूंचे स्त्री पुरुषाना संबोधन.                                                              
        ४३)                     नवदाम्पत्यास श्रीपाद प्रभूंचा कृपा प्रसाद. 
         ४४)                     नामस्मरण महिमा आणि कर्म विमोचन.     
         ४५)                     श्रीपाद प्रभूंचे अंतर्धान.
         ४६)                     श्री वल्लभेश्वराचा वृतांत.
         ४७)                     सिद्ध योग्याचे दर्शन.
         ४८)                     विचीत्रपुरीचा वृतांत.
         ४९)                    पळणी स्वामींचे दर्शन.
         ५०)                     कुरुगड्डीस वासम्बिकेचे दर्शन.
         ५१)                    शंकर भट्टाचे तिरुपती क्षेत्री आगमन.
         ५२)                      कणीपाकात तिरुमल दासाची भेट.
          ५३)                     श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत ग्रंथाचे पिठीकापुरम
                                  क्षेत्री पोचण्याचे विधान— ग्रंथाचे वैशिष्टय.