Tuesday, September 25, 2012

भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त भगवंत, भक्ती, आणि भक्त

               भगवंत, भक्ती, आणि भक्त                     (१)                                 
 भक्ती म्हणजे साधकाची भगवंताप्रती असलेली प्रेमाची अत्युच अवस्था .परंतु भक्ती कशी करावी असा प्रश्न सर्वांनाच पडतो. याचे समर्पक उत्तर समर्थ रामदास आपल्या दासबोध ग्रंथात देतात ते म्हणतात ईश्वराची भक्ती करावयाची म्हणजे भगवंताचा महिमा जाणावा,त्याच्या लीलांचे वर्णन ऐकावे, त्याचे रूप पाहून त्यात विभोर व्हावे.संतांच्या संगतीमध्ये प्रवचन,कथा,कीर्तन यांचे एकचित्ताने श्रवण करून त्याचे मनन करून भगवंताच्या  स्मृतीला मनामध्ये वारंवार  घोळवावे आणि त्यांचे रसपान करावे. भक्तीचा दुसरा प्रकार म्हणजे भगवंताला आपला प्राणसखा मानावे.त्याला आपली सारी सुख दुखः  सांगावीत. आपण जगाचे नातेवाईक नसून केवळ भगवंताचेच आहोत असा पक्का संकल्प मनात सतत  ठेवावा.परमेश्वराच्या चरणी लीन होऊन त्याला आपणास समस्त दुर्गुणापासून दूर करण्याची प्रार्थना करावी.अहंकार हाच आपला सर्वात मोठा शत्रू आहे. तो भगवंताच्या कृपेविना दूर होत नाही.आपले प्रयत्न या बाबतीत तोकडे पडतात. अहंकार मावळला म्हणजे भक्तीचा उदय होतो.आपल्या जीवनात वाट्यास आलेले कर्म भगवंतास आवडेल अश्या प्रकारे करणे आणि जे मिळेल त्यात समाधानाने राहणे हा सुद्धा भक्तीचा एक प्रकार आहे.जी कांही कर्मे करावयाची ती सारी भगवंतासाठीच करावयाची आणि ती भगवंतालाच अर्पण करावयाची. भक्तीमध्ये कर्म आहे ज्ञान आहे तसेच योग सुद्धा आहे. असे आहे भक्तीचे स्वरूप.तर मग आपण चला धरूया भक्तीची कास. भक्तांचे  प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.पहिला सगुण भक्ती करणारा आणि दुसरा निर्गुण भक्ती करणारा, सगुण भक्ती करणारा देवाविषयी अत्यंत प्रेम बाळगणारा असतो.तो सतत परमेश्वराचे सगुण रुपात चिंतन मनन करीत असतो. त्याच्या नेत्रांना सतत भगवंताच्या दर्शनाची आस लागलेली असते.कानांना सदैव त्याच्या कथा,कीर्तने,प्रवचने ऐकण्याची ओढ लागलेली असते.त्याची वाणी अविरत भगवंताचे गुणगान करते.या भक्ताची पंच इंद्रिये भगवंताच्या चरणी समर्पित केलेली असतात. ते डोळ्यांनी हरिरूप पाहतात,कानांनी हरिकथा ऐकतात,जिभेने हरिनामाचे उच्चारण करतात,पायांनी तीर्थ यात्रा करतात आणि हातानी सेवा करतात.अश्या या सगुण भक्ती करणाऱ्या भक्तांना आपली इंद्रिये फुलासारखी वाटतात
दुसरा निर्गुण परब्रम्हाची भक्ती करणारा भक्त स्वावलंबी,सतत इंद्रियांचा निग्रह करतो,तो सर्व प्राणीमात्रांच्या हितामध्ये सदैव मग्न असतो.तो समाजाची निष्काम भावाने सेवा करतो आणि ती करीत असताना त्याला भगवंताची आठवण सुद्धा येत नाही. या दोन प्रकारच्या भक्ती मध्ये कोणती भक्ती श्रेष्ठ असा प्रश्न सर्वांनाच पडतो तसाच तो गीता ऐकताना अर्जुनास सुद्धा पडला होता. त्याने भगवंतास विचारले हे मधुसुदना जे अनन्य प्रेमी भक्तजन निरंतर आपल्या भजनात,ध्यानात मग्न राहून सगुणरूप परमेश्वराची भक्ती  करतात आणि दुसरे जे केवळ अविनाशी सच्चिदानंदघन, निराकार ब्रह्मची उपासना करतात. या दोघा मध्ये उत्तम भक्त कोण? या प्रश्नाचे उत्तर देताना भगवान क्षणभर  भांबावले.त्यांची अवस्था त्या मातेसारखी झाली जिला दोन मुले असावीत आणि तिला विचारले की त्या दोघांमध्ये तिला अधिक प्रिय कोण आहे? भगवान उत्तरले अरे पार्था माझ्या ठिकाणी मन एकाग्र करून निरंतर माझ्या भजन ध्यानात रत  झालेले जे भक्तजन अतिशय श्रेष्ठ श्रद्धेने युक्त होऊन मज सगुण रूप भगवंताला भजतात ते मला योग्यातील अतिउत्तम योगी वाटतात.परंतु जे पुरुष इंद्रिये चागल्या प्रकारे ताब्यात ठेऊन, मन,बुद्धीच्या पलीकडे असणाऱ्या सर्वव्यापी अवर्णनीय स्वरूप आणि सर्वदा असणाऱ्या नित्य अचल,निराकार अविनाशी सच्चिदानंदघन ब्रम्हाचे निरंतर ऐक्य भावनेने ध्यान करीत उपासना करतात तसेच जे   प्राणीमात्रांच्या कल्याणात तत्पर असून सर्वाठायी समभाव ठेवतात ते योगी मलाच येऊन मिळतात.भगवान पुढे म्हणाले निर्गुण भक्ती करणाऱ्या साधकांच्या साधनात कष्ट अधिक असतात कारण देहाचा अभिमान असणाऱ्या भक्ताकडून अव्यक्त ब्रह्मची प्राप्ती कष्टानेच होते.जे भक्तजन मत्परायण होऊन सर्व कर्मे माझ्या ठिकाणी अर्पण करून मज सगुणरूप परमेश्वराचीच अनन्य भावाने निरंतर चिंतन करीत उपासना करतात त्यांचा मी तत्काळ मृत्युरूपी संसारसागरातून उद्धार करतो.भगवान पुढे म्हणाले हे पार्था तू माझ्यातच मन ठेव.माझ्या ठिकाणीच तुझी बुद्धी स्थापन कर म्हणजे तू माझ्यातच राहशील यात शंकाच नाही.जर तू माझ्यात मन निश्चल ठेवण्यास असमर्थ असशील तर हे अर्जुना तू अभ्यास रुपाने म्हणजे नामांचे,गुणांचे,श्रवण, मनन,कीर्तन,करून श्वास द्वारा जप कर.तसेच भगवतप्राप्ती विषयी शास्त्रांचे पठण पाठन करून मला प्राप्त होण्याची इच्छा कर. यद्यपि तू या अभ्यासाला सुद्धा समर्थ नसशील तर केवळ माझ्या साठी कर्म करण्यास परायण  हो. स्वार्थाचा त्याग करून मज परमेश्वराला आपला परम सखा,आश्रय,आणि गती समजून निष्काम प्रेम भावाने,मनाने,वाणीने आणि शरीराने मजसाठीच  यज्ञ,दान तप आदी संपूर्ण कर्तव्य कर्म कर.अशा रीतीने माझ्यासाठीच कर्मे केल्याने सुद्धा माझी प्राप्ती होईल.या योगाचे साधन करण्यासहि तू असमर्थ असशील तर मन बुद्धी इत्यादीवर विजय मिळवून सर्व कर्मफलांचा त्याग कर.कारण त्यागानेच परम शांती मिळते.
 भगवंतानी भक्तांचे तीन प्रकार सांगितले आहेत   .१) सकाम भक्ती करणारा २) निष्काम परंतु एकांगी भक्ती करणारा आणि ३) ज्ञानी म्हणजे संपूर्ण भक्ती करणारा. निष्काम भक्तांच्या पुन्हा तीन शाखा आहेत  अ)आर्त  २) जीज्ञासु आणि क) अर्थार्थी   सकाम भक्ती करणारा भक्त मनात एखादी कामना ठेवून ती पूर्ण होण्यासाठी देवांची भक्ती करतो. ही  भक्ती जरी कमी प्रतीची असली तरी भगवान म्हणतात माझा भक्त सकाम असला तरी मी त्याची भक्ती धृढ  करतो. त्याच्या मनात घोटाळे उत्पन्न करीत नाही. कोणत्यही निमित्ताने का होईना  तो माझ्याकडे आला तर मी त्याच्या पाठीवर हात  फिरवून त्याचे कौतुकच करतो.एकदा भक्तीच्या मंदिरात प्रवेश झाला कि सकाम भक्त सुद्धा पुढे निष्कांम  होतो.आता दुसरा भक्त निष्काम भावाने भगवंताची भक्ती करणारा, त्याला लौकिक विश्वातील कांही मिळावे अशी इच्छाच नसते.केवळ भगवंताचे दर्शन त्याचेच चिंतन, मनन आणि निदिध्यास घडावा अशी त्याची लालसा असते. या निष्काम भक्ताचे तीन प्रकार आहेत- पहिला आर्त भक्त म्हणजे ओलावा पाहणारा, देवासाठी रडणारा,देवाचे प्रेम कधी मिळेल, त्याला मिठी कधी मारीन,त्याच्या पायी  केव्ह्ना लागेन  अशी तळमळ असणारा. प्रत्येक कार्यामध्ये जिव्हाळा आहे का नाही, प्रेम आहे का नाही या भावाने पाहणारा असतो.
ज्ञानदेवांनी नामदेवाला विचारले सर्व संत मंडळी तीर्थयात्रेस जाणार आहेत तू येतोस का? नामदेवाला विठ्ठ्लाचा वियोग सहन करणे कठीण होते. तो म्हणाला पांडुरंगाला विचारून येतो. तो पांडुरंगाच्या मंदिरात जावून पांडुरंगाच्या समोर उभा राहिला त्यावेळी त्याच्या नेत्रांमधून झर- झरा अश्रू धारा वाहू लागल्या. त्यांनी भगवंताच्या चरण कमलाना अभिषेक झाला.असा असतो आर्त भक्त.
 दुसरा प्रकार जिज्ञासू भक्ताचा.या भक्ताच्या मनात निसर्गातील गुह्य शोधून काढण्याची आर्तता असते. असे भक्त गौरीशंकर शिखर पुन्हा पुन्हा चढतात.कोणी उत्तर ध्रुवाच्या शोधात जातात तर कोणी दुर्गम अशा गिरी कन्दरात जाऊन साधना करतात.या भक्ताजवळ अदम्य जिज्ञासा असते.
 तिसरा प्रकार अर्थार्थी भक्तांचा  तो प्रत्येक  गोष्टीत अर्थ म्हणजे हित,कल्याण पाहतो.कोणत्याही गोष्टीची परीक्षा करताना त्याने समाजाचे कल्याण कसे होईल याची कसोटी लाऊन पाहतो.माझे भाषण,लेखन आणि सारे कर्म विश्वाच्या  मांगल्यासाठी कसे होईल याच्या कडे त्याचे ध्यान सतत लागलेले असते.विश्वाचे कल्याण हाच त्याचा आनंद असतो.
प्रेमाच्या दृष्टीने सर्व क्रीयांकडे पाहणारा आर्त भक्त,ज्ञानाच्या दृष्टीने पाहणारा जिज्ञासू भक्त आणि सर्वांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थार्थी हे तिघे निष्काम खरे परंतु एकांगी असतात एक कर्माद्वारा,दुसरा हृदयद्वारा आणि तिसरा बुद्धीद्वारे देवाकडे येतो.
चौथा प्रकार पूर्ण भक्ताचा. याला ज्ञानी भक्त असे म्हणतात.या भक्ताला विश्वातील प्रत्येक प्राणीमात्रात,पशुपक्षात,वृक्षवल्लीमध्ये सर्वत्र भगवंताचेच पावन दर्शन घडते.त्याला शांत गंभीर सागरात देवाचा विलास दिसतो,गायीमध्ये भगवंताची मूर्ती दिसते ,रवी,चंद्रा मध्ये त्याचे तेज आणि भव्यता दिसते तर फुलांमध्ये परमेश्वराची कोमलता अनुभवास येते.अशा रीतीने एकच परमात्मा या विश्वात अनेक रुपानी नटलेला दिसतो.या संदर्भात संत तुकारामांची ओवी समर्पक वाटते.
          नर,नारी बाले अवघा नारायण
           ऐसे माझे मन करी देवा ||
आपल्या प्रिय भक्ताची लक्षणे सांगताना भगवान म्हणतात तो कोणत्याही प्राण्याचा द्वेष करीत नाही.तो सर्वांवर प्रेम करतो आणि अकारण दया करतो.माझ्या भक्तात मी ,माझे  पणाचा लवलेश सुद्धा नसतो.तो सुख आणि दु:खात सम भाव ठेवतो.तो निरंतर संतुष्ट असतो.तो क्षमावान म्हणजे अपराध करणाऱ्याला सुद्धा अभय देतो.त्याने मन, बुद्धी, आणि इंद्रिये आपल्या स्वाधीन ठेवलेली असतात.त्याची भगवंताच्या चरणी गाढ निष्ठा असून त्याने आपले मन,बुद्धी त्याच्या चरणी अर्पण केलेली असते.त्याच्यापासून कोणत्याही प्राण्याला त्रास होत नाही आणि त्याला कोणत्यही प्राण्याचा उबग येत नाही.तो हर्ष, भीती,उद्वेग आदीपासून अलिप्त असतो.त्याला कशाचीही अपेक्षा नसते.तो चतुर,तटस्थ आणि दु:खमुक्त असतो.तो आपल्या कर्तृत्वाचा अभिमान मुळीच बाळगीत नाही.तो हर्षाने फुलून जात नाही आणि दु:खाने त्रस्त होत नाही.तो शुभ आणि अशुभ कर्मांचा त्याग करून भक्तीपूर्ण अंत:करणाने केवळ परमेश्वराचेच चिंतन करीत असतो.तो शत्रू मित्र मान अपमान यात समभाव ठेवतो.सुख दुख ,थंडी उन या सारख्या द्वंदात त्याची स्थिती सारखीच असते.त्याला निंदा स्तुती समानच वाटतात. जे कांही मिळेल त्यात निर्वाह करून तो सर्वदा समाधानी असतो.त्याला निवास स्थानाबद्दल ममता किंवा आसक्ती नसते.तो सदैव इशस्वरूपाचे   मनन करण्यात व्यस्त असतो.भगवान पुढे म्हणतात या लक्षणांनी युक्त जे श्रद्धाळू साधक मत्परायण होऊन निष्काम प्रेम भावनेने मला भजतात ते मला अतिशय प्रिय  होतात.
                
                           || हरी ओम तत्सत ||               

 प्रभाकर गंभीरे
घर न.१-४-२५० न्यू मारुतीनगर कोथापेठ हैदराबाद (आ.प्र)५०००३५
 फोन न. २४0५०४४५
 दिनांक  २६ आक्टोबर २०११ 

No comments:

Post a Comment